अलिबाग : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्रात पिकांच्या उत्पादनाची माहिती अंतिम करण्यासाठी 1944 सालापासून खरीप व रब्बी हंगामात पीक कापणी प्रयोग राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी पीक कापणी प्रयोगाकरीता तालुका कृषी अधिकारी यांच्याकडील सुधारीत यादीनुसार गावनिहाय एकूण 18 (एका गावासाठी प्रत्येकी दोन असे एकूण 36) पीक कापणी प्रयोग निश्चित केले आहेत. त्यानुसार आंबेतर्फे वाजे येथे शेतकरी बाळाराम पालांडे आणि वसंत पाटील यांच्या शेतात सुवर्णा या भात जातीच्या पिकाचा पीक कापणी प्रयोग पूर्ण करण्यात आला.
महसूल, कृषी व ग्रामविकास विभाग यांच्यामध्ये आवश्यक त्या प्रमाणात वाटप करुन व समन्वय साधून पिक कापणी प्रयोगाची आखणी व अंमलबजावणी गेली अनेक वर्षे सुरु आहे. या वेळी नायब तहसिलदार राहूल सुर्यवंशी, मंडळ अधिकारी अजित पवार, तलाठी श्रीनिवास मेतरी, कोतवाल पद्माकर चौधरी व सिताराम वारगडा हे उपस्थित होते.
शासनाकडील निर्देशानुसार सर्व पीक कापणी प्रयोग महसूल, कृषी व ग्रामविकास विभाग यांना नेमून दिलेल्या उद्दिष्टांनुसार व संबंधित पर्यवेक्षण अधिकारी यांच्या पर्यवेक्षणाखाली यशस्वीरित्या पूर्ण करुन त्याची माहिती शासनाच्या सीसीई-अॅग्री या अॅपवर अपलोड करण्यात आली आहे. पिक कापणी प्रयोगातील प्राप्त आकडेवारीवरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पिक कापणी प्रयोग हे पिकनिहाय नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करण्यासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे, तसेच शासनास देखील पिक उत्पन्नाचा अंदाज, शेतमालाची खरेदी, शेतमाल निर्यात धोरण अशा विविध बाबीकरींता पिक कापणी प्रयोगातील आकडेवारीची आवश्यकता भासते.
Check Also
कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …
RamPrahar – The Panvel Daily Paper