वणवे लावल्याने वन्य जीवांचे अस्तित्व धोक्यात

उरण : प्रतिनिधी
उरण, पनवेल, पेण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या जंगलाना बेसुमारपणे वणवे लावण्याचा प्रताप वर्षानुवर्षे सुरूच आहे. असाच प्रताप उरण तालुक्यातील चिरनेर-खारपाडा रस्त्यावरील तलाखराच्या घाटातील पूर्वेच्या डोंगरांला वणवा लावण्यात आला होता. मात्र ही खबर वनविभागाला मिळताच वनरक्षक सन्नी ढोले आणि वन्यजीव संस्थेचे सदस्य महेश भोईर, संतोष पाटील तसेच आदिवासी समाजाचे गुरू कातकरी यांना ही लागलेली आग तासाभराच्या अवधीत आटोक्यात आणण्यात यश प्राप्त आहे. कोरोना संसर्गजन्य व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याने या महामार्गावर वाहनांची वर्दळ अत्यंत कमी प्रमाणात आहे. परंतु भर उन्हाच्या तडाख्यात हा वणवा बेसुमारपणे लावण्यात येऊन पसार झालेल्या समाजकंटकांनी या जंगलात असलेल्या पशुपक्ष्यांचे जीवन उद्धवस्त केले आहे. मात्र बुधवारी लागलेली आग विजविण्यात यश आल्याने काही डोंगराचा भाग वगळता बहुतांशी डोंगर परिसर जळण्यापासून वाचविला आहे. मात्र डोंगराचा काही भाग जळाला आहे.