Breaking News

भाजपचे विस्तारक विश्वेश साठे कालवश

महाड : प्रतिनिधी

महाड तालुक्यातील भाजपचे नेते आणि पनवेलचे विस्तारक विश्वेश साठे यांचे शनिवारी (दि. 23) दुपारी आकस्मिक निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. साठे यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाल्याची भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे.

विश्वेश साठे महाड येथे त्यांच्या घरी आले होते. दुपारी त्यांना अचानक चक्कर आल्याने तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणजोत मालवली होती. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच महाडमध्ये शोककळा पसरली. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते साठे यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी साठे परिवाराचे सांत्वन केले. विश्वेश साठे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply