Breaking News

कर्जतमध्ये नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग; मास्क, गोळ्यांचे वाटप

कर्जत ः बातमीदार

कर्जत शहरावर कोरोनाने वक्रदृष्टी दाखवल्याने शहरातील नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी पालिकेने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. शहरातील नागरिकांची काळजी घेण्यासाठी पालिकेने सर्व नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच पालिकेकडून सर्व नागरिकांना मास्क आणि होमिओपॅथिक गोळ्याही देण्यात येत आहेत.

शहरातील नागरिकांसाठी पालिकेने नॅशनल कमिशन फॉर वुमेन आणि डीजीपी होमगार्ड अ‍ॅण्ड सिव्हिल डिफेन्स यांच्यासोबत करार करीत नगर परिषद हद्दीतील

नागरिकांसाठी विविध योजना प्रत्यक्षात आणल्या आहेत. त्यात शहरातील सर्व नागरिकांना मोफत मास्क दिले जात आहेत. पालिकेच्या सर्व प्रभागांत होमिओपॅथिक मेडिसिन आणि सर्व नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग केले जात आहे. कर्जत नगर परिषद हद्दीत पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ज्या भागात आढळला त्या दहिवली विभागातील संजयनगर परिसरातून या कॅम्पची सुरुवात करण्यात आली.

या वेळी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, विरोधी पक्षनेते शरद लाड, पालिका मुख्याधिकारी पंकज पाटील, स्थानिक नगरसेवक विवेक दांडेकर, स्थानिक नगरसेविका सुवर्णा निलधे, विशाखा जिनगरे तसेच नगरसेविका प्राची डेरवणकर, स्वामिनी मांजरे, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, बळवंत घुमरे, स्वीकृत नगरसेवक संकेत भासे आदी उपस्थित होते.  या वेळी नॅशनल कमिशन फॉर वुमेन आणि डीजीपी होमगार्ड अ‍ॅण्ड सिव्हिल डिफेन्सचे डॉ. नितीन पावले, डॉ. राजाराम पवार, तसेच एफराज बॉम्बले हे वैद्यकीय पथक तपासणी करीत आहे. डॉ. साजिद सय्यद, कल्पेश जैन, दर्शन पोपट, संध्या फर्नांडिस, नसर शेख, डॉ. संगीता पाटील, शरीन अग्रवाल यांच्या समन्वय पथकानेही शहरात फिरून आरोग्यविषयक जनजागृती केली. शहरातील नागरिक पालिकेच्या उपक्रमास उत्तम सहकार्य करीत आहेत. आपल्या लहानशा आजाराचीही माहिती देत आहेत, असे नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी सांगितले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply