खारघर : प्रतिनिधी
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्राचार्य डॉ. डी. जी. डोंगरगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कळंबोली येथील एसएमडीएल महाविद्यालयातदेखील गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. एनएसएस विभाग व डीसीबी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्राचार्य एस. लहुपंचांग यांनी विद्यार्थ्यांना गुरुचे तर प्रा. बी. बी. जाधव यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व समजावून सांगितले.