Breaking News

‘हॉल ऑफ फेम’मध्ये सचिनचा समावेश

लंडन : वृत्तसंस्था

क्रिकेट जगतातील माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा समावेश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ‘हॉल ऑफ फेम’मध्ये करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज अ‍ॅलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाची माजी महिला क्रिकेटपटू कॅथरिन यांनाही हा प्रतिष्ठेचा सन्मान देण्यात आला आहे.

लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सचिन, डोनाल्ड, कॅथरिनसह तिघांचा आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. सचिनच्या आधी भारतामधून माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी, कपिल देव, सुनील गावसकर, अनिल कुंबळे, राहुल द्रविड यांना हा सन्मान देण्यात आला आहे. 

या मानाच्या यादीत स्थान पटकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन पाच वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे सचिनच्या आधी कुंबळे आणि द्रविडचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला होता.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply