पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुका (ग्रामीण) युवा मोर्चा आणि शहर महिला मोर्चा यांच्या वतीने बुधवारी (दि. 5) विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पनवेल तालुका युवा मोर्चाच्या वतीने विविध औषधी वस्तू, धान्य व फळांचे वाटप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी 10.30 वाजता आजिवली हायस्कूल येथे टेबल व खूर्ची साहित्य भेट देणे, 11 वा. सुकापूर येथील लक्ष्मी पब्लिक स्कूल या ठिकाणी वृक्षारोपण, 11.30 वा. भानघर येथील करुणेश्वर ओल्ड एज केअर हाऊस (वृद्धाश्रम)मध्ये मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग मशीन, धान्य व फळे यांचे वाटप आणि दुपारी 12.30 वा. चिंध्रण हायस्कूल येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना सोशल डिस्टन्सिंग पाळून उपस्थित राहण्याचे आवाहन युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे व सहकार्यांनी केले आहे.
पनवेल शहर भाजप महिला मोर्चाच्या वतीने सकाळी 11 वाजता तालुका पोलीस ठाणे व उपजिल्हा रुग्णालय येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली आणि महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास अतिथी म्हणून महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस व नगरसेविका दर्शना भोईर, माजी उपमहापौर व नगरसेविका चारूशीला घरत, महिला व बालकल्याण समिती सभापती कुसुम म्हात्रे, सर्व नगरसेविका-नगरसेविका उपस्थित राहणार आहेत. या वेळी प्रदेश महिला मोर्चाच्या आदेशानुसार रक्षाबंधनाचा कार्यक्रम व कोरोना काळात सेवा बजावणार्या मान्यवरांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्ष वर्षा नाईक, सरचिटणीस सपना पाटील, उपाध्यक्ष नीता माळी व सुहासिनी केकाणे यांनी केले आहे.