Breaking News

नालेसफाईच्या मुद्यावर खोपोली पालिका सभेत गोंधळ

खोपोली ः प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध सखल भागात तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला, याबाबत नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना दोष दिला, याचे चांगलेच पडसाद खोपेाली पालिका सर्वसाधारण सभेत उमटले. प्रश्नोत्तरांच्या तासात बहुतांश नगरसेवक, नगरसेविकांनी प्रशासनाला धारेवर धरीत सभागृह डोक्यावर घेतल्याने, प्रचंड गोंधळ झाला. शहरातील विविध भागातील विकासकामांना मंजुरी व इतर विषयांना मंजुरीबाबत शुक्रवारी छत्रपती शिवाजी महारात सभागृहात सुमन औसरमल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. या सभेला उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, मुख्याधिकारी गणेश शेट्ये, विविध खात्याचे प्रमुख, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. विविध भागात नालेसफाईची कामे समाधानकारक झाले नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर त्यांच्या प्रभागात मोठ्या नालेसफाईसाठी जेसीबी यंत्र पाठविले नसल्याचा मुद्दा बेबी सॅम्युअल, किशोर पानसरे, सुनिल पाटील, जिनी सॅम्युअल आदी सदस्यांनी आक्रमकपणे मांडून आरोग्य खात्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यावर आरोग्य विभागाचे प्रफुल्ल गायकवाड यांनी नालेसफाईचे काम 100 टक्के केल्याचा दावा केला तर मुख्याधिकारी शेट्ये यांनी यावेळचा पडलेला पाऊस प्रचंड असल्याने नदीचे पाणी उलटल्याने परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले. याच मुद्यावर अनेक सदस्य वारंवार उद्भवणार्‍या परिस्थितीबाबत पावसाळयापूर्वी खबरदारी घेणार की नाही याबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याची जोरदार मागणी झाली. चर्चेदरम्यान, नगराध्यक्षा सुमन औसरमल व बेबी सॅम्युअल यांच्यातच शाब्दिक खडाजंगी झाल्याचे पहावयास मिळाले. पालिकेत प्रत्येक बाबींकडे मोहन औसरमल यांना विनंती करावी लागते. तेच कारभार पाहतात का, असा सवाल स्यॅम्युअल यांनी केला.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply