Breaking News

प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती पनवेल-उरण कमिटीची बैठक पनवेल येथील आगरी समाज सभागृहात शुक्रवारी (दि. 26) आयोजित करण्यात आली होती. ही बैठक संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती पनवेल-उरणच्या बैठीचे आरगी समाज हॉलमध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीत तळोजा एमआयडीसीमधील भूसंपादन, पनवेल आणि उरण तालुक्यांमधून जाणार्‍या मल्टीमॅडेल कॉरिडोअर प्रकल्प, सिडको क्षेत्रामध्ये प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली गरजेपोटी घरे नियमित करणे, या सारख्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली, तसेच प्रकल्पाग्रस्तांसंदर्भातील कुठलाही निर्णय समितीसोबत चर्चा करुनच घ्यावा, ही प्रमुख मागणी समितीची आहे.

या बैठकीला समितीचे उपाध्यक्ष बबन पाटील, वाय .टी. देशमुख, निमंत्रक महेंद्र घरत, अतुल पाटील, जे. डी. तांडेल, रवि पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, के. के. म्हात्रे, के. ए. म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, भाजप नेते एकनाथ देशेकर, शिवाजी दुर्गे, उत्तम कोळी, विश्वनाथ कोळी, सीमा घरत, रेखा म्हात्रे, चंद्रकांत घरत, प्रभाकर जोशी, विजय

घरत, दिनेश खानावकर, शिवसेनेचे रामदास पाटील, शेकापचे नेते काशिनाथ पाटील, काँग्रेसचे नंदराज मुंगाजी, सुदाम पाटील, यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.  उत्साहात ही बैठक पार पडली.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply