पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, गुरुवारी (दि. 22) नव्या 208 रुग्णांची आणि नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 275 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 136 व ग्रामीण 36) तालुक्यातील 172, रोहा व महाड प्रत्येकी सात, अलिबाग सहा, खालापूर पाच, पेण चार, उरण, कर्जत व मुरूड प्रत्येकी दोन, आणि तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल (मनपा पाच, व ग्रामीण एक) तालुक्यात सहा, खालापूर दोन आणि अलिबाग तालुक्यात एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 52,765 आणि मृतांची संख्या 1512 झाली आहे. जिल्ह्यात 49,338 जण कोरोनामुक्त
झाल्याने 1865 विद्यमान रुग्ण आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper