Breaking News

खारघरमधील राखी फेस्ट महोत्सवाचा समारोप

खारघर ः रामप्रहर वृत्त

येथील भाजप कार्यालयाजवळ कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने दोन दिवसीय ‘राखी फेस्ट महोत्सवाचे’ अयोजन   करण्यात आले आहे. या महोत्सवात महिलांनी बनवलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या महोत्सवाला सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. दोन दिवसांच्या या महोत्सवाचा समारोप झाला. खारघर येथील भाजप कार्यालयाजवळील मोंट ब्लँक येथे कमळ औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने राखी फेस्ट महोत्सवाचे दोन दिवस आयोजन करण्यात आले होते. उद्योगिनी, लघुउद्योजक व बचत गटातील महिलांनी बनविलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी विक्री प्रदर्शन या महोत्सवात भरविण्यात आले होते. या महोत्सवात आम्ही उद्योगिनीच्या संस्थापिका मीनलताई मोहाडीकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या वेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, नगरसेविका तथा महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा मुग्धा लोंढे, नगरसेविका आरती नवघरे, हर्षदा उपाध्याय, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, प्रसाद बांगर, महिला मोर्चाच्या साधना पवार, मोना आडवाणी, योगिता कडू, शुभांगी रोडकर, अंजली इनामदार, गीता चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply