पनवेल : वार्ताहर
कळंबोली सुधागड हायस्कूलसमोर ठेवण्यात आलेल्या बॉम्ब प्रकरणाचा नवी मुंबईच्या विशेष तपास पथकाने सलग 17 दिवस अथक परिश्रम घेऊन जुलै महिन्यात छडा लावला. या गुन्ह्यात क्लिष्टतेत बारकावे शोधत पोलिसांनी अतिशय शिताफीने या गुन्ह्याची उकल केली. या कामगिरीची पोलीस महासंचालकांनी दखल घेतली आहे. एकूण तीन पथकांना सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
17 जून रोजी कळंबोलीसारख्या माथाडी कामगारांचे वास्तव्य असणार्या वसाहतीत बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी या कामी विशेष पोलीस पथकाची स्थापना केली. त्यामध्ये विजय कादबाने, संदिपान शिंदे या अधिकार्यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त कोंडीराम पोपेरे, अजय कुमार लांडगे यांच्यासारखे अनुभवी अधिकारी या तपास पथकात होते. निवृत्ती कोल्हटकर, शिरिष पवार, राहुल राख, रूपेश नाईक, राजेश गज्जल, सुधिर निकम, विजय चव्हाण, संदीप गायकवाड, भुषण कापडणीस, योगेश वाघमारे, राणी काळे, योगेश देशमुख, नितीन शिंदे हे अधिकारी सोबतीला होतेच. यामध्ये हेमंत सूर्यवंशी, स्नेहल जगदाळे, मंगल गायकवाड, राजेश सोनवणे, बाबाजी थोरात, अनिल यादव, प्रकाश साळुंखे, उमेश नेवारे, वैभव शिंदे, मनोज चौधरी, उमेश ठाकूर, सचिन टिके या पोलीस कर्मचार्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. अथक तपास करून शेवटी पोलिसांनी सुशील साठे, मनीष भगत, दीपक दांडेकर या आरोपींना अटक केली.