Breaking News

हर्षिता भोईरच्या विक्रमाची इंडिया रेकॉर्ड बुकमध्ये नोंद

उरण ः रामप्रहर वृत्त

उरण तालुक्यातील भेंडखळ गावची हर्षिता कविराज भोईर या पाच वर्षांच्या चिमुरडीने राज्यातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर सर केले होते. याची दखल इंडिया रेकॉर्ड बुकने घेऊन तिला सन्मानित केले आहे. हर्षिता भोईर या पाच वर्षीय चिमुरडीने 7 जून 2019 रोजी राज्यातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर अवघ्या साडेतीन तासांत न थकता पूर्ण केले होते. हे शिखर सर केल्यानंतर तिचा हुरूप वाढत आता माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा ती प्रयत्न करणार असल्याचे समजते. हर्षिताने आतापर्यंत कर्नाळा, राजमाची, श्रीवर्धनगड, पालघरचा अशेरी त्याचप्रमाणे रायगड अनेक वेळा सर केला आहे. हर्षिताच्या गरुडभरारीची दखल इंडिया रेकॉर्ड बुकने घेत त्यांच्या रेकॉर्ड बुकमध्ये नोंद करून तिचा यथोचित सन्मान करून सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरव केला. तिचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply