Breaking News

रायगडच्या खेळाडूंचे घवघवीत यश

पनवेल : वार्ताहर

आठवी राज्यस्तरीय युनिफाइट स्पर्धा कोल्हापूर येथे झाली. या स्पर्धेत युनायटेड शोतोकन कराटे असोसिएशनच्या कामोठे, वेश्वी, ओवळे व उरण या शाखेतील 27 खेळाडू सहभगी झाले होते. त्यांनी 15 सुवर्ण, 7 रौप्य, 5 कांस्य अशा पदकांची लयलूट केली.

विजयी खेळाडूंची 30 व 31 ऑगस्ट रोजी पंजाबमधील लुधिया येथील संतान हॉलमध्ये होणार्‍या राष्ट्रीय युनाफाइट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल युनायटेड शोतोकन कराटे असोसिएशनचे अध्यक्ष मंदार पनवेलकर, रवींद्र म्हात्रे, प्रशिक्षक सागर कोळी, स्वप्नाली सणस, सुरज टकले, तसेच नीलेश भोसले, प्रशांत गांगर्डे, विवेक व संपूर्ण यूएसकेए इंडिया परिवाराकडून सर्वांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

पदकप्राप्त खेळाडू

सुवर्ण-तनिष्क नागणे, प्रथमेश वास्कर, जान्हवी पाटील, आरूशी मोरे, हर्ष पाटील, साईराज साळुंखे, श्रेयस म्हात्रे, तन्वेश मोरे, अविक मुखर्जी, नवनाथ गंगनमले, प्रांजल पाटील, रूतिका हिले, सोनम राजिवडे, मानस पाटील, मानसी केळी; रौप्य-धनुष रेड्डी, पद्मजा रेड्डी, सई शिंदे, शिवराज चव्हाण, पलक मेंढे, वेदिका पाटील, वृषभ घुले; कांस्य-आदित्य बांगर, यशराज करावडे, विष्णू सिंग, त्रिशिता भोईर, श्रेयस चव्हाण.

युनिफाइट असोसिएशनच्या वतीने कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत कर्जतमधील चार खेळाडूंनी यश संपादन केले आहे. या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेत जगदीश बाळकृष्ण पेरणेकर याने सुवर्णपदक, प्रतीक नीलेश बनसोडे व आदित्य पवनकुमार सूर्यवंशी यांनी रौप्यपदक, तर श्रेयश संतोष लवांडे याने कांस्यपदक पटकाविले. हे खेळाडू 30 ऑगस्टला विवेक गायकवाड यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली लुधियाना (पंजाब) येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांचे मंदार पनवेलकर यांनी अभिनंदन केले.

यशस्वी खेळाडूंना कर्जतचे मुख्य प्रशिक्षक विवेक गायकवाड, प्रशिक्षक जीवन ढाकवल, नितीन आगीवले, नितीन गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply