Breaking News

रायगड जिल्ह्यात भगवान महावीरांचा विविध उपक्रमांनी जयघोष

नेरळला महिलांचा सहभाग

कर्जत : बातमीदार

भगवान महावीर यांच्या 1826व्या जयंतीनिमित्त नेरळ येथील जैन धर्मियांनी भगवान महावीरांच्या मूर्तीची मिरवणूक काढून आनंद साजरा केला.

भगवान महावीर यांची मूर्ती रथावर घेऊन बसण्याचा मान नेरळमधील व्यापारी सोहोनलाल मियाचंद जैन यांना मिळाला होता. त्या कुटुंबातील लिलाबेन सोहोनलाल जैन, शोभा मोहनलाल जैन, रीना संजय जैन आणि रिशिता संजय जैन यांनी रथामध्ये बसून भगवान महावीर यांच्या प्रतिमेसोबत मिरवणुकीत सहभाग घेतला. जैन मंदिर भागातून निघालेली मिरवणूक नेरळमधील शिवाजी महाराज चौकातून माथेरान रस्त्याने हुतात्मा हिराजी पाटील चौकातून लोकमान्य टिळक वाचनालयामार्गे शिवाजी महाराज मैदान येथे असलेल्या जैन मंदिरात पोहचली.

  • कर्जतला जैन समाजाची मिरवणूक

कर्जत : प्रतिनिधी

शहरातील जैन बांधवांनी बुधवारी (दि. 17) महावीर जयंती उत्साहात साजरी केली. या निमित्ताने कर्जतमध्ये महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

दीपक रत्न विजयजी महाराज, योग रत्न विजयजी महाराज व साध्वीजी महाराज यांच्या उपस्थितीत शहरातील जैन मंदिरापासून निघालेली मिरवणूक बाजारपेठेतून लोकमान्य टिळक चौकमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून छत्री केंद्रामार्गे पुन्हा जैन मंदिराकडे आली. अध्यक्ष फुटरमल जैन, वालचंद ओसवाल,   रणजित जैन, अशोक ओसवाल, मोहन ओसवाल, उमेदमल जैन, मंगल परमार, पारस जैन, प्रकाश जैन, राजेश सोलंकी, पंकज ओसवाल, नितीन परमार, प्रवीण भलगट, संजय ओसवाल, विनोद ओसवाल, सचिन ओसवाल, मनीषा ओसवाल, शांती राणावत, ऊर्मिला बाफना, शोभा जैन, आशा ओसवाल, भावना ओसवाल,  नीता ओसवाल, सुरेखा ओसवाल, दर्शना ओसवाल, मंगला ओसवाल, आदी मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  • नागोठण्यात जल्लोष

नागोठणे : प्रतिनिधी

जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर यांची जयंती बुधवारी नागोठणे शहरात धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली.

यानिमित्ताने जैन मंदिरातून सकाळी 10 वाजता भगवान महावीरांची पालखी काढण्यात येऊन ती बाजारपेठ, शिवाजी चौक, पोलीस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय, गांधी चौक, खुमाचा नाका मार्गे दुपारी मंदिरात परतली. या पालखी सोहळ्यात माजी जि. प. सदस्य नरेंद्र जैन, माजी सरपंच प्रकाश जैन, अ‍ॅड. प्रवीण जैन, राजेंद्र जितमल जैन, रमेश पिताणी, प्रवीण पोरवाल, सुरेश पोरवाल आदींसह समाज बांधव, तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सायंकाळी भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply