Breaking News

नवनाथनगर, लोकमान्य नगरमधील खड्डे भरण्यास सुरुवात

पनवेल ः रामप्रहर वृत्त  – महानगरपालिकेच्या प्रभाग 17 मधील नवनाथनगर ते रेल्वेस्टेशन रोड व लोकमान्य नगर भगतचाळ येथे रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे. खडी टाकून हे खड्डे भरले जात आहेत.

या रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत नाही. खड्डे पडल्याने पावसाळ्यात याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. हे खड्डे भरावेत, यासाठी नगरसेवक प्रकाश बिनेदार व त्यांचे सहकारी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका सुशीला घरत, नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी पाठपुरावा केला. पाठपुरावा करणार्‍या सर्वांचे येथील भाजप पदाधिकारी व नागरिकांनी आभार मानले आहेत.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply