पनवेल : प्रतिनिधी
अभिनेता मंगेश देसाई, दिग्दर्शक गिरीश मोहिते यांच्याशी मनमोकळा संवाद सांधण्यासाठी आणि त्यांना भेटण्याची संधी आणि ‘चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल’ फेम आणि मिमिक्रीमध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकलेला हास्यअभिनेता योगेश सुपेकर यांच्यासोबत ‘घ्या हसण्यावारी’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. कळंबोली येथील सबॅस्टिअन चर्च, सेक्टर 8 येथे शनिवारी (दि. 10) सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजता होणार्या खास कार्यक्रमात सिनेतारकांशी दिलखुलास गप्पा मारता येणार आहेत. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘नाते तुमचे आमचे’ या शीर्षकाच्या या कार्यक्रमात अभिनेता मंगेश देसाई, दिग्दर्शक गिरीश मोहिते आणि योगेश सुपेकर यांची कॉमेडी आणि मिमिक्रीबरोबर त्यांच्याशी गप्पा होतीलच. त्याचसोबत महिलांना पैठणीचा खेळ खेळून बक्षिसे मिळविण्याचीही संधी मिळणार आहे. ही आगळीवेगळी मैफल सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, नगरसेविका विद्या गायकवाड, मोनिका महानवर, प्रमिला पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, सरचिटणीस लीना पाटील, प्रतिभा भोईर, कुंदा मेंगडे, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, महिला अध्यक्षा प्रियंका पवार व पदाधिकार्यांनी केले आहे.