Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर विकास मंडळातर्फे वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांची मदत करण्यात येत असते. त्या अंतर्गत पनवेल तालुक्यातील पडघे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत मंडळाच्या वतीने वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी करण्यात होते. हा कार्यक्रम भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पनवेल तालुक्यातील पडघे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यावाटपाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, भाजपचे युवा मोर्चा पनवेल महानगरपालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, माजी सरपंच रघुनाथ पाटील, के. टी. भोईर, गुरुनाथ भोईर, रघुनाथ भोईर, आशीष कडू, कुशा भोईर, भरत ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply