कर्जत : बातमीदार – तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील मोरेवाडीमधील एका आदिवासी शेतकर्याचा गुरांचा गोठा रविवारी (दि. 28) रात्री कोसळला. त्यातील बैल गळ्यातील दोर्या तोडून पळून गेल्याने वाचले असून, गोठ्यामध्ये झोपलेले शेतकरी लहू दरवडा हेदेखील बचावले आहेत.
मोरेवाडी परिसरात रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस आणि वारा होता. त्या वादळात लहू दरवडा यांचा गुरांचा गोठा कोसळला. त्या गोठ्यात तीन बैल बांधून ठेवले होते. ते तिन्ही बैल गळ्यात बांधलेले दोर तोडून तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरले, तर गोठ्यात झोपलेले शेतकरी लहू देहू दरवडा हेदेखील गोठा कोसळला त्या आवाजाने तेथून बाहेर पडल्याने आपला जीव वाचवू शकले. त्यांची पत्नी घरी जेवायला गेली होती. त्यामुळे त्यादेखील या घटनेतून वाचल्या आहेत.
कर्जत तहसील कार्यालयाने तत्काळ सुगवे येथील तलाठी विशे यांना घटनास्थळी पाठवून कोसळलेल्या गोठ्याचा पंचनामा पूर्ण केला आहे.