Friday , September 22 2023

थंडीमुळे भाज्यांची आवक कमी

पनवेल : बातमीदार

थंडीमुळे एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक कमी होत आहे. परिणामी फरसबी, गवार, कारले या भाज्यांचे दर 20 टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती घाऊक भाजीपाला व्यापार्‍यांनी दिली. भाजीपाला बाजारात दररोज 550 ते 600 गाड्या भाजीपाला येत असतो, मात्र 500 ते 525 गाड्यांची नोंद झाली आहे. त्यात फरसबी, गवार आणि कारले यांची आवक 30 ते 40 टक्के घटली आहे. थंडीमध्ये भाज्यांचे उत्पादन कमी होते. त्यामुळे होणारी आवक कमी झाल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. त्यामुळे या भाज्यांच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फरसबी 40 ते 44 रुपये प्रतिकिलो होती ती आता 50 ते 55 रुपयांवर गेली आहे. 32 ते 36 वरून 36 ते 40 रुपये; तर कारली 36 वरून 40 ते 44 रुपयांवर आली आहेत. किरकोळ बाजारातही याचा परिणाम जाणवत असून, तेथेही 20 टक्क्यांनी या भाज्यांचे दर वाढले आहेत. 40 रुपयांनी प्रतिकिलो मिळणारी फरसबी 60; तर कारली 50 वरून 60 व गवारी 80 रुपयांनी विकली जात आहे. एपीएमसी बाजारात थंडीमुळे भाज्यांची आवक कमी होत आहे. यामध्ये प्रामुख्याने फरसबी, कारली आणि गवार या भाज्यांचे दर 20 टक्के वाढले असल्याचे भाजीपाला व्यापारी महासंघाचे कैलास तांजणे यांनी सांगितले.

Check Also

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …

Leave a Reply