Breaking News

तिन्ही आरोपी डॉक्टरांना जामीन मंजूर

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण

मुंबई : प्रतिनिधी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली असून, मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणार्‍या डॉ. पायल तडवी हिने 22 मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतिगृहातील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉक्टर हेमा अहुजा (वय 28), डॉ. अंकिता खंडेलवाल (वय 27) व डॉ. भक्ती मेहरे (26) या तिघींनी जातिवाचक शेरेबाजी करून रॅगिंग करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप आहे. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला. या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 23 जुलै रोजी न्यायालयाने आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी 25 जुलैपर्यंत तहकूब केली होती. त्यानंतर 30 जुलै रोजी न्यायालयाने सुनावणी आठवडाभरासाठी तहकूब केली होती. न्यायालयात आज पुन्हा जामीन अर्जावर सुनावणी झाली.

या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. जामिनावर सुटलेल्या आरोपींना मुंबईबाहेर जाण्यास मनाई करतानाच, त्यांनी दिवसाआड न्यायालयासमोर हजेरी लावावी, असे निर्देशही दिले आहेत. या दरम्यान आरोपी डॉक्टरांना नायर रुग्णालय किंवा आग्रीपाडामध्ये जाण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply