Breaking News

विराटकडून बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या महिन्यापासून सोशल मीडियावर बॉटल कॅप चॅलेंजची खूप चर्चा आहे. सर्वसामान्य लोक आणि अनेक कलाकारांनी हे चॅलेंज स्वीकारून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही हे चॅलेंज पूर्ण करीत त्याचा व्हिडीओही ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत विराटने हातातील बॅटने रिव्हर्स शॉट खेळून बॉटलचे झाकण खोलण्याचे चॅलेंज पूर्ण केले. या व्हिडीओत भारताचे कोच रवी शास्त्री यांच्या आवाजातील कॉमेंट्रीचा आवाज येतो. विराटने रिव्हर्स शॉट खेळल्यावर बॉटलचे झाकण खाली पडते. त्यानंतर त्याच बॉटलमधील पाणी तो पिताना दिसतो. ’कधीही न होण्यापेक्षा उशिरा झालेले चांगले,’ असे कॅप्शनही विराटने दिले आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply