Saturday , March 25 2023
Breaking News

सुधागडमध्ये जखमी घुबडाला पक्षीमित्राकडून जीवदान

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्राणी व पक्षीप्रेमी तुषार केळकर यांना तीन दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेतील घुबड दिसले. त्यांनी त्याला पकडून त्याच्यावर उपचार केले व  या जखमी घुबडाचे प्राण वाचविले.

तुषार केळकर हे रात्री आपल्या दुचाकीवरून शेतावरून आपल्या घरी जात होते. त्यावेळी त्यांना रस्त्याच्या शेजारी उडण्यासाठी धडपड करणारे पूर्ण वाढ झालेले घुबड दिसले. तुषार यांनी घुबडाला पकडले आणि आपल्या शेतावर नेले. तेथे घुबडाची व्यवस्थित पाहणी केली असता घुबडाच्या पंखाला जखम झालेली  दिसली. त्याच्यावर उपचार करून त्यांनी घुबडाला बेडूक व उंदीर खाऊ घातले.

सध्या हे जखमी अवस्थेतील घुबड तुषार यांच्याकडेच असून ते त्याची योग्य निगा राखत आहेत. आता या घुबडाची जखम काही प्रमाणात भरली असून ते पहिल्यापेक्षा अधिक तरतरीत झाले आहे, मात्र अजूनही घुबडाला उडता येत नाही.

या घुबडाचा सांभाळ केला नसता तर कदाचित त्यावेळी भटक्या कुत्र्यांनी त्याचे प्राण घेतले असते किंवा उपचाराविना या घुबडाचा मृत्यू झाला असता, पण आता या घुबडाला नवे जीवन मिळाले आहे. या पक्षीप्रेमीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

– घुबडाबद्दल अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत. आपल्या परिसंस्थेतील घुबड हा एक महत्त्वाचा घटक आहे. हे घुबड बरे व सक्षम झाल्यावर त्याला सुरक्षित सोडणार आहे.

-तुषार केळकर, पक्षी-प्राणीप्रेमी

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply