Breaking News

‘पटेल ज्वेलर्स’ पेढीला ग्राहकांची प्रथम पसंती

पनवेल : रामप्रहर वृत्त

विश्वास हीच परंपरा हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत पनवेल स्थित पटेल ज्वेलर्स या वर्षी आपली सिल्वर ज्युबली साजरी करीत आहे. 25 वर्षांपूर्वी झवेरी बाजार येथे सुरू केलेले एक छोटेसे दुकान आज एका भव्य शोरूममध्ये रूपांतरीत झाले आहे. अत्यंत प्रामाणिकपणा, चोख सोने व उत्कृष्ट ग्राहकसेवा यामुळे या दुकानाची रायगड जिल्ह्यात तीन शोरूम झालेली आहेत. पनवेलपाठोपाठ पेण व उरण येथील शोरूमना उत्कृष्ट सेवेसाठी ग्राहकांनी पसंती दिलेली आहे. सोन्याबरोबर चांदीच्या वस्तू, हिर्‍याचे दागिने व जेम्स स्टोन उपलब्ध आहेत. रायगड जिल्ह्यानंतर उत्तर गुजरात येथील मोडासा येथे पटेल ज्वेलर्सचे शोरूम सुरू झालेले आहे. दागिन्यांमध्ये अंगठी, पेडंट, एअररिंग, मंगळसूत्र, बांगड्या, ब्रेसलेट, नथ, नेकलेस, ठुशी, चैन, चमकी, बाजूबंद, पैंजण, अनेक प्रकारच्या माळा, नवरत्ने अशा नवीनतम प्रकारचे भरपूर प्रमाणात कलेक्शन उपलब्ध आहे. याचबरोबर गिफ्ट व्हाऊचर्स व गिफ्ट आर्टिकल्स आणि वॉल माऊंट फे्रम्स, सोन्याची घड्याळे, चांदीचे पूजासेटसुद्धा उपलब्ध आहेत. दसरा, दिवाळी सणाकरिता अनेक नवीन प्रकारची डिझाईन्स आलेली आहेत.

Check Also

स्व. गंगादेवी बालदी यांची शोकसभा; मान्यवरांकडून श्रद्धांजली

उरण : रामप्रहर वृत्तउरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे नुकतेच …

Leave a Reply