Breaking News

उरणकरांची पूरग्रस्तांना मदत

उरण ः वार्ताहर

सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितील बांधवांना आपली छोटी मदत खूप मौल्यवान ठरू शकते, या उद्देशाने जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मदतीच्या आवाहनास प्रतिसाद देत महेश बालदी यांचे विश्वासू नवघर जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष तथा सोनारीचे माजी सरपंच महेश नरेश कडू यांच्या वतीने श्रीसाई समर्थ इंटरप्रायजेस व जय मातादी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ (रजि) यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 हजार रुपयांचा धनादेश जेएनपीटी ट्रस्टी तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्याकडे सोमवारी (दि.12) सुपूर्द केला.

याप्रसंगी श्रीसाई समर्थ इंटरप्रायजेसचे दिनेश तांडेल, राकेश कडू, महेश म्हात्रे, चंद्रकांत अनंत कडू तसेच जय मातादी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे (रजि) अध्यक्ष सुनील नरेश कडू, उपाध्यक्ष अतुल पाटील, सेक्रेटरी कैलास म्हात्रे, खजिनदार अरुण करंडे, आशिष भरत तांडेल, राजेश भोईर, मनीष तांडेल, नामदेव विशे, अभय तांडेल, जगदिश म्हात्रे, राजेश मुंबईकर, तुषार ठाकूर, दिलीप कडू, सुनील कडू, महेश म्हात्रे, सुदर्शन लांडगे, मनोज कडू, महेश महिंद्रकर, गिरीश तांडेल, रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, भाजप उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, भाजप उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवीन पनवेलमधील मंडळांची मदत आज होणार सांगलीकडे रवाना

पनवेल ः बातमीदार

 कोल्हापूर व सांगली येथे उद्भवलेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे पूरग्रस्तांसाठी मदतकार्य मिळावे म्हणून नवीन पनवेल येथील जय बजरंग मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, ओम साई मित्र मंडळ, जिव्हाळा मित्र मंडळ यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या आवाहनाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी (दि. 13) ही मदत सांगलीकडे रवाना होणार आहे. मंडळातर्फे नवीन पनवेल येथील बांठिया हायस्कूलमध्ये सर्व अत्यावश्यक वस्तू तीन खोल्यांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. तांदूळ, तेल, साबण, सात हजार सॅनेटरी नॅपकिन, मास्क, कपडे, बिस्किटे, चिवडा, तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर, चहा, पाणी, ब्लँकेट, औषधे  इत्यादी जवळपास चार ते पाच लाखांच्या वस्तू स्वरूपात नागरिकांनी जमा केल्या आहेत. पूरग्रस्त भागातील 500हून अधिक कुटुंबांना ही मदत दिली जाणार असल्याची माहिती जय बजरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष विनोद वाघमारे यांनी दिली. पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी मंडळाच्या योगेश हाडगे, विशाल जितकर, तेजस म्हात्रे, राजेंद्र घरत, अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी विशेष मेहनत घेतली.

Check Also

नमो चषक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतला आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने उलवे नोडमध्ये 23 ते 25 जानेवारीपर्यंत …

Leave a Reply