Breaking News

बेटी बचाओ-बेटी पढाओ

बांठिया स्कूलमध्ये भाजपचा उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त

बांठिया स्कूल येथे भाजपप्रणित बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राबविण्यात आले. इयत्ता 7वी ते  12वीपर्यंतच्या विद्यार्थिनींना नॅचरल हेल्थ अ‍ॅण्ड फाऊंडेशनतर्फे डॉ. दीपक खाडे यांनी मुलींच्या आरोग्यासंदर्भात माहिती दिली.

 विशेष अतिथी म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत उपस्थित होत्या. बेटी बचाओ, बेटी पढाओच्या  जिल्हा संयोजिका सुहासिनी केकाणे, सहसंयोजिका अंजली इनामदार, संयोजिका नीता माळी, सहसंयोजिका भारती एकलेरे, संयोजिका अनिता रणदिवे, सहसंयोजिका सुनीता गुरव आदींनी हा उपक्रम पूर्ण पनवेल तालुक्यातील सर्व शाळांत राबविण्याचे आयोजन केले आहे. तालुक्यातील सर्व शाळा सहकार्य करीत आहेत, अशी माहिती सुहासिनी केकाणे यांनी दिली.

Check Also

पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …

Leave a Reply