Breaking News

रायगडातून 66 हजार लोकांचे परराज्यात जाण्यासाठी अर्ज

औद्योगिक प्रकल्पांमध्ये निर्माण होणार मनुष्यबळाची समस्या

अलिबाग : प्रतिनिधी – परराज्यात जाण्यासाठी रायगड जिल्ह्यातील 66 हजार लोकांनी रायगड जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. काही राज्यातील लोक परत जाण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे औद्योगिक प्रकल्प, बांधकाम या क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाची समस्या निर्माण होणार आहे.

रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो.  जिल्ह्यात दिड हजारहून अधिक औद्योगिक प्रकल्प आहेत. तसेच बांधकाम देखील मोठ्याप्रमाणावर होत आहे. येथे काम करणारे मजूर परप्रांतीय आहेत. इतकेच नव्हे तर मासेमारी बोटींवर काम करणारे बहुतांश खलाशी परप्रांतीय आहेत. टाळेबंदीमुळे बंद असलेले उद्योग नेमके कधी सुरु होतील याची स्पष्टता नाही. त्यामुळे जिल्ह्यात अडकून पडलेले कामगार आपआपल्या गावी पररण्याच्या मानसिकतेत आले आहेत. त्यांनी आपल्या मुळगावी परत जाण्यासाठी अर्ज केले आहे.

66 हजार लोकांनी आपल्या राज्यात परत जाण्यासाठी अर्ज केले आहेत.  ज्या राज्यांनी या  लोकांना आपल्या राज्यात राज्यात घेण्याची तयारी दाखवली आहे. त्या राज्यातील लोकाना त्यांच्या राज्यात पाठविण्याची व्यवस्था केली जात आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, बिहार, ओडीसा, तेलंगणा या राज्यांनी त्याच्या राज्यातील कामगारांना पाठविण्यास अनुमती दिली आहे. तर कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेशसारख्या राज्यांनकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या राज्यातील नागरीकांबद्दल अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

मजुरांना परत पाठविण्यास सुरुवात झाली आहे. मात्र येवढ्या मोठ्या संख्येनी कामगार आपआपल्या राज्यात परत गेले तर औद्योगिक प्रकल्प, बांधकाम या क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाची  समस्या निर्माण होणार आहे. 

जिल्ह्यात मोठे औद्योगिक प्रकल्प आहेत. बांधकाम होत आहेत. मच्छीमारी बोटींवर मोठ्या संख्येनी परप्रांतीय खलाशी आणि तांडेल काम करतात. हे सर्व आता आपल्या गावी परतण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. त्यामुळे औद्योगिक प्रकल्पांमध्ये  अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply