नागोठणे : प्रतिनिधी
कोएसोच्या नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात एनएसएसतर्फे नुकतीच महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटीच्या अंतर्गत रोहा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय संलग्न रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली. रुग्णालयाचे समुपदेशक महेश गोसावी, मंगेश पाटील यांनी या वेळी विद्यार्थ्यांना एचआयव्ही एड्सविषयी मार्गदर्शन केले, तर प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांनी एड्स रोग होण्याची कारणे या वेळी स्पष्ट केली. या रेड रिबन क्लबच्या अध्यक्षपदी कृष्णाली घरत हिची, तर सचिव म्हणून श्रुतिका निजामकर यांची निवड करण्यात आली. क्लबद्वारे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी सांगितले. या वेळी रक्त चाचणी घेण्यात आली. यात 25 विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणम सावंत यांनी, तर डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. ज्योती प्रभाकर, प्रा. विकास शिंदे, रोहित धोत्रे, मयुरी कोंडे आदींनी विशेष सहकार्य केले.