Breaking News

भिंगारी जिल्हा परिदषदेच्या शाळेत वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

भिंगारी गावातील रायगड जिल्हा परिदषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळळाच्या वतीने वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम भिंगारी गावातील कराडी समाज हॉलमध्ये झाला. या वेळी पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे आणि माजी उपमहापौर चारुशीला घरत उपस्थित होत्या. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने दरवर्षी शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. त्याअंतर्गत भिंगारी गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने वह्यावाटप करण्यात आले. या वेळी प्रभाग समिती ड चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक अजय बहिरा, भाजपचे प्रभाग क्रमांक 20चे अध्यक्ष मनोहर मुंबईकर, सूरदास गोवारी, स्वप्नाली परदेशी, जगदिश परदेशी, रूपेश परदेशी, पद्माकर पालव, अशोक परदेशी, पंकज डावलेकर, बजरंग पाटील, शांताराम भगत, कुंदा डावलेकर, मुख्याध्यापिका ललिता पवार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना वह्यावाटप केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply