नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे दि. 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान‘वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019’ हे भारतातील पहिल्या आयुष संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयुर्वेद औषध उत्पादनात अग्रगण्य असलेली ‘श्री धूतपापेश्वर लिमिटेड’ या कंपनीने संमेलनाला भेट देणार्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.
नागरिकांसाठी ‘आयुष एक्स्पो 2019 व आरोग्य’मध्ये स्टॉल क्र. 35 ते 50 मध्ये सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत बी.एम्.डी. अर्थात् बोन मिनरल डेन्सीटी चाचणी केवळ रु. 40 मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.
याचबरोबर बालकांच्या सर्वांगिण विकास व निरोगी आयुष्यासाठी आयुर्वेदात सांगितलेल्या सुवर्णप्राशन शिबिराचे आयोजनही या आयुष एक्स्पोमध्ये फक्त 50 रुपये प्रति डोस करण्यात आले आहे. सुवर्णबिंदू प्राशन हे नवजात बालकापासून ते वय वर्षे 16पर्यंत देण्यात येते. या शिबिरातून जमा होणारी रक्कम पूरग्रस्तांसाठी दिली जाणार आहे.