उलवे नोड ः रामप्रहर वृत्त
मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, उलवे नोड, पूर्व प्राथमिक शाखेत कृष्ण जन्माष्टमीनिमित्त चॉकलेट हंडी फोडण्यात आली. चिमुरड्या राधा-कृष्णने नृत्य सादर केले
’कृष्णा’ अॅनिमेटेड चित्रपटातील दहीहंडी दृश्य पाहताना विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. या प्रसंगी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन, सेकंडरी पर्यवेक्षक भरत जितेकर यांची उपस्थिती लाभली. पूर्व प्राथमिक शाखेच्या पर्यवेक्षिका गौरी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.