नवी मुंबई : रामप्रहर वृत
नवी मुंबई येथील होप मिरर फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेकडून गरीब आणि गरजू नागरिकांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या पदाधिकार्यांनी गरीब आणि गरजू नागरिकांना घरोघरी जाऊन बधुवारी (दि. 14) मदत केली.
होप मिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली संस्था आहे. कोरोना काळात या संस्थेने गरीबांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये ज्या व्यक्तींचे हातावर पोट आहे, जे लोक रोजंदारीवर जगतात त्यांना जगण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्याचे कार्य ही संस्था करीत आहे.
नवी मुंबई, पनवेल येथील भागात राहणारे गरीब आणि गरजू लोकांपर्यंत संस्थेचे स्वयंसेवक पोहचले. त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळून यात मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग राखून नागरिकांना रेशन किटचे घरोघरी वाटप केले. या उपक्रमाला लाभार्थ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला.
संस्थेचे संस्थापक रमझान शेख यांनी उपक्रमात सहसंपूर्ण टीम, सहयोगी, स्वयंसेवक आणि देणगीदारांचे तसेच या उपक्रमात मदत करणार्या केलॉगच्या तळोजा एमआयडीसी शाखेचे प्रमुख प्रमोद वाडकर यांचे होप मिररकडून आभार मानले आहेत.