Breaking News

60 वर्षांचे क्रिकेट करिअर

वय वर्षे 85, क्रिकेट करिअर 60 वर्षांचे, दोन लाखांपेक्षा अधिक सामने, सात हजार विकेट्स, आश्चर्य वाटले ना. हे करिअर आहे विंडीजच्या सेसिल यांचे. नुकतीच त्यांनी निवृत्ती जाहीर केली.

मूळ विंडीजच्या वेगवान गोलंदाज सेसिल राइटने नुकतीच क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यांनी आपल्या 60 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्यामुळे क्रिकेटच्या विश्वात त्यांच्या नावाची फारशी चर्चा नव्हती. आता मात्र निवृत्तीच्या नुसत्या घोषणेने त्यांनी जगाच्या कानाकोपर्‍यातील तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. याला कारणही तसेच दमदार आहे. कारण विंडीजचा हा वेगवान गोलंदाज आता वयाच्या 85व्या वर्षी निवृत्त होत आहे. त्याने आपल्या क्रिकेटच्या 60 वर्षांच्या करिअरमध्ये तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक सामने खेळण्याचा पराक्रम गाजवला. यादरम्यान त्यांच्या नावे सात हजार विकेट्सची नोंद आहे. अशा प्रकारची अपूर्व कामगिरी नोंदवणार्‍या सेसिलच्या निवृत्तीची चर्चा होणे साहजिकच आहे. सेसिल यांनी आपल्या क्रिकेट करिअरला 1959मध्ये सुरुवात केली. म्हणजेच आजघडीला त्यांचे करिअर 60 वर्षांचे आहे. सेसिल यांनी लीग आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये दिग्गज क्रिकेटपटू गॅरी सोबर्स आणि रिचर्डस यांच्यासोबत सामने गाजवले आहेत. मनात आले तसेच करा व खा. त्यामुळेच तुम्हाला वेगळे काहीतरी करता येईल, याच शब्दांतून सेसिल यांनी दीर्घकाळ क्रिकेटचे मैदान गाजवण्याच्या यशाचा मूलमंत्र सांगितला आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply