2014च्या निवडणुकीनंतर भाजपच्या मतांमध्ये वाढ होऊ लागली आहे. झपाट्याने भाजपची मते वाढताना दिसताहेत. नवमतदार भाजपकडे आकर्षित होत आहेत. मागील निवडणुकांचा विचार केला, तर भाजपच्या मतांची टक्केवारी वाढल्याचे चित्र दिसून येते. राष्ट्रवादीची मते मात्र घसरताना दिसताहेत. चार निवडणुकांनंतर राष्ट्रवादीच्या मतांचा आकडा 17.4 टक्क्यांपर्यंत घसरला. म्हणजेच राष्ट्रवादीची मते 5.2 टक्क्यांनी घटली. आमदारांची संख्या 58वरून 41 अशी 17ने घसरली. विजयाचा स्ट्राईक रेट 24.89 टक्क्यांवरून 14.74 टक्के असा 10.15 टक्क्यांनी घसरला.
1999 ते 2014 या चार विधानसभा निवडणुकांतील यशापयशाचा आढावा घेतल्यास महाराष्ट्रातील राजकारण झपाट्याने बदलल्याचे दिसून येते. काँग्रेसमधील दिग्गज नेते शरद पवार यांनी 1999मध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चौथा सक्षम पर्याय निर्माण झाला. पुढे या दोन्ही काँग्रेसने एकत्र येत 15 वर्षे सत्ता संपादन केली असली, तरी त्यांचे सूर मात्र कधीच जुळले नाहीत. एकमेकांचे खच्चीकरण करण्यातच या दोन्ही पक्षांनी धन्यता मानल्याने 2014मध्ये सत्तेवरून पायउतार होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. या दुहीचा फायदा घेत राज्यात शिवसेना-भाजप वाढत गेली. सुरुवातीला ‘थोरल्या भावा’चे बोट धरून मोठ्या होत असलेल्या भाजपने 2009मध्ये मात्र शिवसेनेपेक्षा दोन जागा जास्त मिळवून चमक दाखवून दिली होती. 2014मध्ये मात्र शिवसेनेच्या मदतीशिवाय इतिहास घडवला. 1990नंतर राज्यात प्रथमच एखाद्या पक्षाने शंभरहून अधिक जागा पटकावण्याचा विक्रमही केला. या काळात शिवसेनेनेही स्वबळावर चांगली कामगिरी करत मतटक्का वाढवला असला तरी त्यांची आमदार संख्या सहाने घटली. भाजपची मते चार निवडणुकांत 14.54 टक्केवरून थेट 46.92 टक्केवर; आमदार 56 वरून 122 वर 1999मध्ये भाजपला 14.54 टक्के मते होती. चार निवडणुकांनंतर हा आकडा थेट 46.92 टक्केवर गेला. म्हणजेच भाजपची मते 32.38 टक्के वाढली आहेत. आमदारांची संख्याही 56 वरून 122 म्हणजेच 66ने वाढली. विजयाच्या स्ट्राईक रेटमध्ये मात्र 47.86 टक्केवरून 46.92 टक्के अशी किरकोळ घसरण झाली. शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढली, आमदार संख्या व विजयाचा स्ट्राईक रेट मात्र 20 टक्के कमी 1999मध्ये शिवसेनेला 17.33 टक्के मते होती. चार निवडणुकांनंतर हा आकडा 19.5 टक्केवर गेला. म्हणजेच शिवसेनेची मते 2.17 टक्के वाढली. आमदारांची संख्या मात्र 69 वरून 63 अशी घसरली. त्यात 6 टक्क्यांनी घट झाली. विजयाचा स्ट्राईक रेट 42.85 टक्केवरून 22.34 टक्केपर्यंत म्हणजेच 20.51 टक्के घसरला. काँग्रेसची आमदार संख्या 75 वरून 42 पर्यंत घसरली, मते 9 टक्के तर स्ट्राईक रेट 15 टक्के घटला. 1999 मध्ये काँग्रेसला 27.2 टक्के मते होती. चार निवडणुकांनंतर म्हणजे 2014च्या निवडणुकीत आकडा 18.1 टक्केपर्यंत घसरला. म्हणजेच काँग्रेसची मते 9.1 टक्केने घटली. आमदारांची संख्या 75 वरून 42 अशी तब्बल 33ने घटली. विजयाचा स्ट्राईक रेट 30.12 टक्केवरून 14.63 टक्के असा 15.49 टक्केने कमी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसची मते 5 टक्क्यांनी घटली, आमदारांचा आकडाही 17ने घसरून 41 पर्यंत 1999च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 22.6टक्के मते होती. हा आकडा घसरताना दिसत आहे, तर भाजपची ताकद राज्यात वाढताना दिसत आहे.