Monday , June 5 2023
Breaking News

गंभीरने जाहीर केली त्याची चर्ल्डकप टीम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट टीम वर्ल्डकप आधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय सीरिज खेळत आहे. भारतीय टीमच्या मॅनेजमेंट वर्ल्डकपसाठीची टीम अजून घोषित केलेली नाही. संपूर्ण देशाचं लक्ष हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 वनडे सिरीजवर आहे. कारण आताची कामगिरी ही वर्ल्डकपमध्ये टीमचा आत्मविश्वास वाढवणार आहे.

अनेक दिग्गज खेळाडूंनी वर्ल्डकपसाठी आपली टीम जाहीर केली आहे. भारताचा माजी खेळाडू गंभीरने देखील त्याची टीम जाहीर केली आहे. गौतमने त्याच्या टीममध्ये एक असा बदल केला आहे ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गंभीरने त्याच्या टीममध्ये विकेटकीपरच्या जागेसाठी स्पर्धेत असलेल्या दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत या दोघांनाही जागा दिलेली नाही, तसेच त्याने रवीद्र जडेजाच्या जागी अनुभवी स्पिनर रविचंद्रन अश्विनला जागा दिली आहे.

अश्विनने त्याच्या वनडे करिअरमधील शेवटचा सामना जुलै 2017 मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय टीममध्ये संधी मिळाली नाही. दुसरीकडे कुलदीप आणि चहल या जोडीने वनडे सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. दोघांची टीममधील जागा निश्चित मानली जात आहे. स्टार स्पोर्टससोबत बोलताना गंभीरने म्हटलं की, केएल राहुलला तिसर्‍या स्थानी बॅटिंग करण्यासाठी टीममध्ये घेतलं जावं. गौतमने पंत आणि कार्तिकच्या ऐवजी हार्दिक पांड्या, विजय शंकर आणि केदार जाधव या ऑलराउंडर्सला टीममध्ये स्थान दिलं आहे, तसेच जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीनंतर उमेश यादवला त्याने टीममध्ये घेतलं आहे.

गंभीरची टीम : रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली, अंबाती रायुडू, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, विजय शंकर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव.

Check Also

ज्युनिअर पनवेल प्रीमियर लीगमध्ये एफएससीसी, रॉकविला फायटर्स विजयी

पनवेल ः रामप्रहर वृत्त मिडलक्लास सोसायटीच्या मैदानावर सुरू असलेल्या टीआयपीएल ज्युनिअर पनवेल प्रीमियर लीगच्या दुसर्‍या …

Leave a Reply