महाड : प्रतिनिधी
येथील नामदेव हितवर्धन संस्थेतर्फे मंगळवारी (दि. 26) श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त नवी पेठ येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
समाजातील गोपाळराव डंबे व पुष्पलता डंबे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई व श्री संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. पहाटे काकड आरती करण्यात आली. सकाळी श्री संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची महाड शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.
समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ नाझरे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय माळवदे, संकेत पोरे (नाना), स्वप्निल मुळे, कौशिक पोरे, रितेश वनारसे, राहुल बागडे, कैलास सलगरे, तेजस बकरे, महिला मंडळाच्या सुप्रिया टमके, रेणुका बकरे, कविता बारटक्के, शोभा अवसरे, प्रिया खोडके इत्यादी समाज बांधवांनी हा संजीवन समाधी सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.