Breaking News

खेडमध्ये संतप्त प्रवाशांकडून रेल्वेगाडीची तोडफोड

खेड : मुंबईकडे परतण्यासाठी खेड स्थानकात उभ्या असलेल्या संतप्त प्रवाशांनी दरवाजे न उघडल्याने रत्नागिरी-एलटीटी एक्स्प्रेसच्या एसी कोचची रविवारी

(दि. 8) तोडफोड केली. गौरी-गणपती विसर्जनानंतर मुंबईकडे परतण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या संख्येने खेड स्थानकात गर्दी केली होती. मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकावर थांबवण्यात आली, मात्र ही गाडी प्रवाशांनी भरलेली होती. या एक्स्प्रेसमध्ये खेडमधील प्रवाशांना शिरता आले नाही. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर आलेली रत्नागिरी-एलटीटी हॉलिडे एक्स्प्रेसही प्रवाशांनी खच्चून भरलेली होती. गाडीची दारे आतल्या प्रवाशांनी बंद करून ठेवली होती. परिणामी स्थानकात उभ्या प्रवाशांचा राग अनावर झाला आणि त्यांनी ट्रेनच्या काचा फोडल्या, तसेच रुळावर दगड ठेवले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply