Breaking News

वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर

पनवेलजवळील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील भाताण गावाजवळ एका अज्ञात वाहनाची धडक एकाला बसल्याने, त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत. अरविंद दसमी (24, रा. रायपूर) असे मयत व्यक्तीचे नाव असून रंग सावळा, केस काळे, पायात निळ्या रंगाची नवीन फुलपॅन्ट व काळ्या रंगाचा फुलबाह्याचा शर्ट व त्यावर पांढर्‍या रंगाची चौकोनी नक्षी आहे. या व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे दूरध्वनी 27452444 किंवा पोलीस उपनिरीक्षक रूपाली चौधरी यांच्याशी संपर्क साधावा.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply