Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण

कळंबोली ः रामप्रहर वृत्त

कळंबोली भाजपच्या वतीने पर्यावरणाचे संवर्धन व प्रदूषणावर मात, हा संदेश देताना आमदार प्रशांत ठाकूर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन भाजपचे कळंबोली शहर उपाध्यक्ष व समाजसेवक नितीन काळे व भाजप कळंबोली शहर उपाध्यक्ष यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते. हे स्पर्धेचे दुसरे वर्षे असून या स्पर्धेत श्रींची आकर्षक मूर्ती, आकर्षक देखावा, सामाजिक उपक्रम व शिस्तप्रिय पद्धतीने बाप्पाचे विसर्जन अशा मंडळांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

कळंबोली शहर मर्यादित आमदार प्रशांत ठाकूर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत येथील गणेशभक्तांच्या कलागुणांना वाव देताना कळंबोली शहर भाजपने प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळत

असून, अनेक गणेश मंडळांनी या स्पर्धेत भाग घेतला.

या स्पर्धेत शिस्तप्रिय विसर्जन म्हणून पहिल्या नंबरचे बक्षीस गुरू संकल्प सांस्कृतिक मंडळ यांना कळंबोली भाजप महिला शहर अध्यक्ष प्रियंका पवार व दुर्गा साहनी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, तर सामाजिक उपक्रम म्हणून सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सवातून चांगला संदेश जनतेपर्यंत पोहचविलेल्या एकता सामाजिक सेवा संस्था या मंडळाला दोन नंबरचे बक्षीस पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, आकर्षक देखावा म्हणून राजे शिवाजी मंडळाला नगरसेवक राजूशेठ शर्मा व भाजपचे राजेंद्र बनकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, तर श्रींची आकर्षक मूर्ती म्हणून कळंबोली युथ क्लबला कळंबोली भाजप शहर अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी भाजपचे रविशेठ पाटील, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील, नगरसेवक राजू शर्मा, महिला शहर अध्यक्ष प्रियंका पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व गणेशभक्त उपस्थित होते. प्रस्तावित भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष अशोक मोटे यांनी केले, तर या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक नितीन काळे यांनी केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply