Breaking News

रोह्यातील 229 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या

तालुक्यात केंद्र प्रमुखासह 61 कर्मचार्‍यांची कमतरता

रोहे ः प्रतिनिधी

तालुक्यातील 229 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील 82 शिक्षकांनी जिल्हा बदली घेतली असून, परजिल्ह्यातील एकूण 111 शिक्षक रोहा तालुक्यात दाखल झाले आहेत. तरीही तालुक्यात आद्याप केंद्र प्रमुखांसह 61 शिक्षकांची कमतरता आहे.

रोहा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 237शाळा आहेत. तेथे 2018-19 या शैक्षणीक वर्षात एकूण 6733 विद्यार्थी शिकत होते. तालुक्यात दरवर्षाप्रमाणे यंदाही शिक्षकांची कमतरता आहे.  रोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत आद्याप 61 शिक्षकांची कमतरता आहे. तालुक्यात केंद्रप्रमुखाच्या 18 जागा मंजूर आहेत. त्यापैकी नऊ जागा रिकाम्याच आहेत. मुख्याध्यापकाची पाच पदे मंजूर असून, त्यातील एक जागा रिकामी आहे. पदवीधर विषय शिक्षकांच्या 76 जागा मंजूर आहेत. त्यापैकी 8 जागा रिकाम्या आहेत. उपशिक्षकाच्या 470 जागा असून, त्यापैकी मराठी शाळेच्या 41 आणि उर्दु शाळेच्या दोन अशा एकूण 43 जागा  रिक्त आहेत.

शिक्षण विभागातील रिक्त पदे

मागील शैक्षणिक वर्षात शिक्षकांची कमतरता मोठी होती. या वर्षी ही कमतरता कमी झाली असली तरीही रोहा तालुक्याच्या शिक्षण विभागात आद्याप विस्तार अधिकारी (वर्ग 3)ची दोन, केंद्र प्रमुखाची नऊ, मुख्याध्यापकाचे एक, पदवीधर विषय शिक्षकांची आठ तर मराठी व उर्दू उपशिक्षकांची 43 पदे रिक्त आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply