Friday , September 29 2023
Breaking News

बँकेच्या नावाने फसवणूक दीड लाखांची रोकड लंपास

पनवेल : बातमीदार 

एस.बी.आय.बँकेतून बोलत असल्याचे सांगून डेबीट कार्डची माहिती घेवून त्याद्वारे नवीन पनवेल येथील एका 80 वर्षीय इसमाच्या माझे बँक खात्यातील दीड लाख रुपये अज्ञात इसमाने काढून घेतले आहेत. खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबाबमी सिथारामय्या व्यंकटरामय्या परूचुरी (वय-80वर्षे, सेवानिवृत्त) यांच्या एस.बी.आय बँक शाखा पनवेल येथील बँक शाखेतील खात्यावर पेश्ननचे पैसे जमा होतात. एका अज्ञात इसमाने तो एस.बी.आय.बँकेतून बोलत असल्याचे सांगून परूचुरीयांच्या बँक अकाऊंट संदर्भातील डेबीट कार्डची माहिती घेवून त्याद्वारे त्याने बँक खात्यातील अकूण 1 लाख 58 हजार 854 रूपये काढून घेतले. या अज्ञात इसमाने तो एस.बी.आय बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्याने बँक अकाऊंट व डेबीट कार्डचे व्हेरिफिकेशन कऱण्याचे आहे असे सांगून बँक अकाऊंट व डेबीट कार्डची माहिती घेतली व पैशांची फसवणूक केली. खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-कामोठेतही प्रकार डेबिट कार्डाच्या डेटा द्वारे अज्ञात इसमाने 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कामोठे परिसरात घडला आहे.   कामोठे येथील सिसिलिया फ्रान्सीस अलमेडा (वय-49 वर्षे) यांच्या बँक खात्यातून अज्ञात इसमाने प्रत्येकी 3 वेळा 10 हजार रुपये काढून घेतले आहेत. डेबीट कार्डचा डाटा कोणीतरी अज्ञात इसमाने कोठुनतरी प्राप्त करुन किंवा कोणत्यातरी इलेक्ट्राँनिक माध्यमाचा वापर करुन कर्नाटका बँकेतील अकाऊंट मधुन परस्पर 30 हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली आहे. कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply