पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या प्रयत्नांमुळे प्रभाग 17 मधील मालधक्का झोपडपट्टीतील कुष्ठरोग्यांसाठी शौचालयाची उभारणी मनपाच्या वततीने करण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष या झोपडपट्टीत अनेक कुष्ठरोग्यांची कुटुंबे वास्तव्य करून आहेत. त्यांना शौचालयासाठी गटारातून उघड्यावर जावे लागत होते. अॅड. वाघमारे यांनी त्याची दखल घेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या यांच्या सहकार्याने चार शौचालय बांधून देण्याचा निर्णय घेतला. त्याची कार्यवाही सुरू आहे.
Check Also
सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …