कारवाईची मागणी
पनवेल : वार्ताहर
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनसह संचारबंदी लादण्यात आली होती. या काळापासून पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गुटख्यांची सर्रास विक्री सुरू असून संबंधित पोलीस ठाण्यांसह अन्न व प्रशासनाने यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.
पनवेल शहरासह नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर आदी भागात रस्त्यावर असणार्या छोट्या टपर्यांसह बियर शॉपीजवळील दुकानात एसटी स्टँड परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, झोपडपट्टी आदी ठिकाणी सर्रास गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असून यांच्यावर कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पनवेलमधील एक बडा व्यापारी या सर्व दुकानदारांना गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ पुरवठा करीत आहे. काम हे रात्रीच्या वेळी केली जात असून अनेक वेळा पोलिसांनी पकडलेल्या संबंधित गाड्या काही वेळातच सोडण्यासुद्धा येत आहेत. अनेक उद्योगधंदे बंद असताना गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा माल पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात आणला गेला आहे.
पनवेल शहर पोलिसांनी पनवेल परिसरात असणार्या गोदामातील मालावरसुद्धा कारवाई करून तो साधा जप्त करावा, अशी मागणी होत आहे. राज्यात गुटखाबंदी असतानाही या मालाची वाहतूक व विक्री कशी काय केली जाते याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.