पनवेल ः रामप्रहर वृत्त
सुप्रीम कौन्सिल नवी मुंबई गुरुद्वारच्या वतीने दि. 20 सप्टेंबर रोजी कळंबोली गुरुद्वार सहिबा येथे गुरुमत समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुनानक यात्रा पुणेकडून नवी मुंबई व मुंबईत येत असून यानिमित्त दि. 21 रोजी आंतरराष्ट्रीय नगर कीर्तन कामोठे-कळंबाली हायवे ब्रिजखाली यात्रेचे दुपारी 3 वाजता भव्य स्वागत होईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता खारघर उत्सव चौक येथून ही यात्रा सीबीडी बेलापूरकडे रवाना होईल. दि. 22 सकाळी 9.30 वाजता नगर कीर्तन ऐरोली गुरुद्वार साहेब येथे होईल. तसेच सकाळी 11 ते 12 या वेळेत पालखी व दर्शन सोहळा होईल. यानंतर ही यात्रा मुंबईकडे रवाना होईल.