Breaking News

कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांची सुटका

मोहोपाडा : वार्ताहर

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपटा गावात एका घरासमोर चारा पाण्याची सोय न करता कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेल्या जनावरांची सुटका करण्यात आली. रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या सतर्कतेमुळे या सहा गाई व दोन वासरांना जीवदान मिळाले आहे.

मौजे आपटा येथे ही जनावरे सुफियान जलिल मुल्ला याने स्वतःच्या फायद्यासाठी आणून त्यांना चारा पाण्याची सोय न करता कत्तल करण्यासाठी डांबून ठेवल्याची माहिती रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांना मिळाली होती. या वेळी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी कारवाई करून सहा गाई व दोन वासरांना कत्तलीपासून वाचवून जीवदान दिले आहे. या जनावरांची अंदाजे किंमत 26 हजार रुपये असून, त्यांची रसायनी पोलिसांनी सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षिततेसाठी कल्याण येथील गोशाळेत पाठविण्यात आले आहे. याबाबत आरोपी सुफियान जलिल मुल्ला याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस निरीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस श्री. कांबळे अधिक तपास करीत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply