Breaking News

भाजप जासई विभाग युवा मोर्चा अध्यक्षपदी नीलेश पाटील

उरण ः रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सूचनेने पनवेलचे आमदार तथा सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थित जेएनपीटीचे विश्वस्त भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या आशीर्वादाने आणि युवा तालुका अध्यक्ष शेखर तांडेल यांच्या सहकार्याने आणि प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा जासई विभाग अध्यक्षपदी नीलेश पाटील यांची नुकताच निवड झाल्याचे नियुक्तीपत्र लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, नगरसेविका आशा शेलार, जानवी पंडित, स्नेहल कासारे (पाटील) उरण शहर महिला प्रमुख संपुर्णा थळी, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, शशिकांत पाटील, चंद्रकात घरत, दीपक भोईर, सुधीर घरत तालुका चिटणीस नीळकंठ घरत, सुनील पाटील, विभागीय अध्यक्ष कुलदीप नाईक, मेघनाथ म्हात्रे, तालुका खजिनदार संदीप पाटील, समीर मढवी, युवा सरचिटणीस तेजस पाटील, वेश्वी सरपंच अजित पाटील, खोपटे सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर, दिघोडे सरपंच सोनिया मयुर घरत आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

Check Also

खारघर येथे रक्तदान महाशिबिर; आमदार प्रशांत ठाकूर यांनीही दिले योगदान

खारघर ः रामप्रहर वृत्तश्री परशुराम जयंतीचे औचित्य साधून खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी …

Leave a Reply