खारघर ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पार्टीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल परिसरामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पंतप्रधानांचा जीवन परिचय व्हावा या उद्देशाने 21 व 22 सप्टेंबर रोजी ‘मोदी’ कहानी भारत माता के सच्चे सुपुत्र की हे चित्र प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते शनिवारी (दि. 21) उद्घाटन झाले. भारतीय जनता पार्टीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल परिसरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवन परिचय नागरिकांना व्हावा, या उद्देशाने 21 व 22 सप्टेंबर दरम्यान खारघर येथील रोझी लिटिल वर्ड मॉलमध्ये मोदींवरील चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक अभिमन्यूशेठ पाटील, नीलेश बाविस्कर, नरेश ठाकूर, रामजीभाई बेरा, नगरसेविका अनिता पाटील, आरती नवघरे, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, गीता चौधरी, साधना पवार, बिना गोगरी, मोना अडवाणी, निशा सिंग, लखवीर सिंग सैनी, रवींद्र नायर, वासुदेव पाटील, गुरुनाथ म्हात्रे, विपुल चौतालिया, केतन नवघरे, प्रशांत रणदिवे, कीर्ती नवघरे, संजय मुळीक, कळंबोळी शहर अध्यक्ष रवीनाथ पाटील, राजेश मोटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या चित्रप्रदर्शनाबाबत महापौर डॉ. कविता चौतमोल आणि शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी अधिक माहिती दिली. या चित्रप्रदर्शनामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जीवन, तसेच त्यांनी केलेले कार्य चित्रांच्या माध्यमातून दाखविण्यात येणार असून, सर्व नागरिकांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी यावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.