Breaking News

खारघर भाजपतर्फे रक्तदान शिबिर

खारघर ः रामप्रहर वृत्त

खारघर शहर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने डॉ. प्राची पारेख आयुर्वेदिक क्लिनिक यांच्या माध्यमातून खारघर से. 13 येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात मोफत रक्तदाब (बीपी), शुगर, हिमोग्लोबिन यासह इतर तपासण्या करण्यात आल्या. आपल्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे डॉ. प्राची यांनी सांगितले. त्याचबरोबर प्राचीन काळापासून आयुर्वेदाचे महत्त्व असल्याचे देखील त्यांनी पटवून दिले. सेवा सप्ताहानिमित्ताने शुक्रवारी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संक्रमणासाठी नवी मुंबई ब्लड बँक यांची टीम आली होती. या वेळी खारघर शहर भाजप अध्यक्ष ब्रिजेशभाई पटेल, नगरसेवक तथा प्रभाग अ समिती सभापती शत्रुघ्न काकडे, सरचिटणीस किरण पाटील, दीपक शिंदे, डॉ. प्राची पारेख, नवी मुंबई ब्लड बँकेचे डॉ. किशोर बडगुजर, भाजप कार्यकर्ते भरत पटेल, शिवम सिंग शामला आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply