पनवेल : रामप्रहर वृत्त
रवीन हॉटेल दी पॅलेस ऑफ दी वाइंडसद्वारा आयोजित एआयटीए सुपर सीरिज 2019ची फ्युचर स्टार्स जुनिअर टेनिस टूर्नामेंट नुकतीच चिपळूण येथे झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)ने सुयश प्राप्त केले आहे.
‘आरटीपीएस’ची विद्यार्थिनी आनंदी भुतडा (इयत्ता सहावी) हिने लॉन टेनिसच्या 12 वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटात प्रथम क्रमांक पटकाविला, तसेच तिने एकेरीतही सहभाग घेऊन द्वितीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थिनीचे संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.