Breaking News

हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक छळ

पतीसह सासू व दीरावर गुन्हा दाखल

पेण : प्रतिनिधी

पैशासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी तिचा पती, सासू व दीर यांच्या विरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेण तालुक्यातील डोलवी येथील महिलेचे 4 मे 2017 रोजी लग्न झाले असून, त्यानंतर 1 ऑगस्ट 2017 ते 9 एप्रिल 2019 या कालावधीत तिचा पती, सासू आणि दीर  तिच्याकडून पैशाची मागणी करीत होते. पैसे देण्यास नकार दिला म्हणून तिचा पती, दीर व सासू यांनी संगनमत करून महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिला शिवीगाळ, दमदाटी व हाताबुक्याने मारहाण केल्याप्रकरणी तिचा पती, सासू व दीर या तिघांना विरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक पाटील करीत आहेत.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply